वाढदिवसाला आलेल्या महिलांशी गैरवर्तन, मारहाण

बोल्हेगाव उपनगरातील घटना || चौघांविरूध्द गुन्हा
वाढदिवसाला आलेल्या महिलांशी गैरवर्तन, मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वाढदिवसासाठी आलेल्या दोन महिलांना मागील घरगुती भांडणाच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनीमारहाण करण्यात आली. एकीसोबत गैरवर्तन केले. बोल्हेगाव उपनगरात शिवाजी चौकात रविवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरेजा प्रशांत क्षीरसागर, स्वप्नाली बाबासाहेब मकासरे, सोनाली सागर वाकडे (सर्व रा. शिवाजीचौक, नवनाथनगर, बोल्हेगाव) आणि प्रशांत क्षीरसागर यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. बोल्हेगावातील शिवाजी चौक भागातील तरेजा क्षीरसागर हिच्या मुलीच्या वाढदिवसासाठी दोन महिला रविवारी सायंकाळी आल्या होत्या. त्यावेळेस मागील भांडणाच्या कारणातून तरेजा क्षीरसागर हिने मारहाण करण्यास सुरूवात केली.

त्यावेळी स्वप्नाली मकासरे व सोनाली वाकडे या दोघींनीही मारहाण केली. प्रशांत क्षीरसागर हा घरातून बाहेर आला. त्याने संबंधित महिलेशी गैरवर्तन केले. या महिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत पीडित महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खाली पडून गहाळ झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com