पतीला मारहाण, पत्नीचा विनयभंग

सावेडी उपनगरातील घटना; तोफखान्यात गुन्हा
पतीला मारहाण, पत्नीचा विनयभंग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रात्रीचे जेवण झाल्यानंतर पायी फिरण्यासाठी निघालेल्या पती-पत्नीला पाच जणांनी शिवीगाळ करत पतीला मारहाण केली तर पत्नीशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. या प्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द विनयभंग, मारहाण आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावेडी उपनगरात शुक्रवारी रात्री 10 वाजता ही घटना घडली. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीवरून धनवन दिघे (बाळ्या), विक्रांत (भावड्या) दिघे, यश रहाणे, योगेश देशमुख व धनवन दिघेची आई छायाबाई (सर्व रा. वैदूवाडी, अहमदनगर) व त्यांच्या सोबतचे अनोळखी चार इसम यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी रात्री फिर्यादी व त्यांचे पती जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी जात असताना आरोपींनी टणक वस्तू फिर्यादीच्या पतीच्या तोंडावर मारून त्यांना जखमी केले. विक्रांत, यश आणि योगेश यांनी फिर्यादीच्या अंगाला स्पर्श करून त्यांच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. इतर आरोपींनी पतीला मारहाण केली असल्याचे पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.