प्रियकराने 'या' कारणावरून केले प्रियसीचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल

प्रियकराविरुध्द गुन्हा दाखल करून अटक
प्रियकराने 'या' कारणावरून केले प्रियसीचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल

अकोले |प्रतिनिधी| Akole

प्रियकर चुकीचे वागत असल्याने रिलेशनशीप ठेवण्यास नकार दिल्याने चिडलेल्या प्रियकराने अश्लील व्हिडीओ व विवस्त्र अवस्थेतील फोटो प्रेयसीच्या गावात फेकल्याची खळबळ जनक घटना अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील एका गावात घडली.

याप्रकरणी संबधित तरुणीने अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यात चंद्रशेखर आनंदा कोटकर (वय 28) रा. कुंभेफळ, ता अकोले यांचेवर भादंवी कलम 354 ( क) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 76 व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम 3 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत अकोले पोलीसांकडून समजलेली माहिती अशी, आरोपी चंद्रशेखर आनंदा कोटकर हा व संबधित तरुणी संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील कृषी विद्यालयात एकत्रित शिक्षण घेत होते, तेव्हापासून त्यांची ओळख आहे. या दरम्यान हा तरूण व 27 वर्षीय अविवाहित तरूणीचे प्रेमसंबंध जुळले. मालदाड येथील शिक्षण घेतल्यानंतर आरोपी नारायणगाव, तालुका जुन्नर येथील एका कृषीविषयक खाजगी कंपनीत नोकरीस लागला.

दरम्यान मधल्या काळात त्यांच्या दोघांत काही कारणावरुन बिनसले. त्यात प्रियकर हा प्रेयसी बरोबर चुकीचे वागत असल्याच्या कारणावरून पुढे पिडीतेने त्यास रिलेशन ठेवण्यास नकार दिला. पिडीत तरुणीने आपल्याबरोबर रिलेशनशीप ठेवण्यास नकार दिल्याने प्रियकर असलेल्या आरोपीने चिडून जाऊन त्याच्या ताब्यात असलेल्या पिडीतेच्या अश्लील व विवस्त्र अवस्थेतील काही व्हिडोओ क्लीप रेकॉर्डिंग पिडीतेच्या ओळखीच्याच मोबाईल नंबरवर व सुमारे दोन रिम कागद भरतील एवढ्या संख्येत तयार केलेले असंख्य प्रकारातील फोटोज तिच्या गावातून रहदारी व वर्दळ असलेल्या सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर व गावातीलच मंदीर परिसरातून इतस्ततः हेतूपुरस्सर विखरून टाकून तरुणीची बदनामी केली.

संबंधित फिर्यादी घरकाम करणारी तरुणी हिचे त्याचे सोबत प्रेमसंबंध असल्याने त्याचे मोबाईलमधून असलेली फिर्यादी हिची व्हिडोओ क्लीप व अश्लील फोटो फिर्यादीचे मोबाईल मधुन सिमकार्ड काढून घेवून ते त्याचे मोबाईलमध्ये टाकून फियादीचे सदर सिमकार्डमध्ये सेव्ह असलेल्या तिच्या काही मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांच्या मोबाईल नंबरवर आरोपीने व्हाट्सअप करून फिर्यादीची नग्न व अश्लील अवस्थेतील व्हिडीओ क्लिप व्हायरल केली.

तसेच शुक्रवारी (16 एप्रिल) रात्री 8.30 वाजता व बुधवारी (21 एप्रिल) सकाळी 6 वाजता यातील फिर्यादी बरोबर आरोपी चंद्रशेखर कोटकर रा. कुंभेफळ हा तिचे बरोबर चुकीचे वागत असल्याने फिर्यादीने तरुणीचे डेव्हलप केलेले नग्न अवस्थेतील फोटो टाकून तिची बदनामी केली आहे. यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास संगमनेर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक अभय परमार हे करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com