‘या’ तालुक्यात लहान मुलांच्या कारणावरून हाणामार्‍या

‘या’ तालुक्यात लहान मुलांच्या कारणावरून हाणामार्‍या

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून एका महिलेला गज व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दि. 21 मे रोजी राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथे घडली आहे.

दि. 21 मे रोजी दुपारी साडेबारा वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथे बालम बशीर शेख यांच्या घरासमोर काही मुले खेळत होती. यावेळी आरोपी भाऊसाहेब दौंड याने घरासमोर खेळणारे फिर्यादीचे लहान मुलांना खेळण्याचे कारणावरून शिवीगाळ केली. यावेळी बालम शेख यांच्या पत्नी आरोपीला शिवीगाळ करू नका असे समजावून सांगत होते. याचा राग येऊन बालम शेख यांच्या पत्नीस आरोपीने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. बालम शेख हे भांडणाची सोडवासोडव करण्यास मध्ये पडले. त्यावेळी त्यांना लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले. तसेच शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

शेख यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भाऊसाहेब नभु दौंड रा. पिंपरी अवघड याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. व कलम - । 393/21 भादंवि. कलम -324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक अमित राठोड हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com