अहमदनगरमध्ये दोन एटीएम मशीन फोडले; पोलीस घटनास्थळी

अहमदनगरमध्ये दोन एटीएम मशीन फोडले; पोलीस घटनास्थळी

अहमदनगर|Ahmedagar

सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवर असलेल्या बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र हे दोन एटीएम चोरट्यांनी आज पहाटे फोडले. यामधून किती रक्कम चोरीला गेली याची माहिती अद्याप समोर आली नसून तोफखाना पोलीस व फिंगर प्रिंट, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. बॅंकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

जिल्ह्यात एटीएम फोडीच्या घटना सर्रास सुरू आहे. आज सोमवारी पहाटे चोरट्यांनी पाईपलाईन रोडवर बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोन एटीएम मशीन कटरच्या सहाय्याने फोडले. एटीएम फोडण्यापूर्वी चोरांनी एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याला कलर स्प्रे मारला होता. सकाळी काही ग्राहक एटीएमवर आल्यानंतर त्यांना एटीएम फोडल्याचे लक्षात आले. त्यांनी स्थानिक तोफखाना पोलिसांना याची माहिती दिली.

यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीस दलाने श्वानपथक पाचारण केले होते. श्वान एटीएम मशीन आणि एटीएम मशीनसमोरचा परिसरातच घुटमळले. चोरटे हे वाहनातून आल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पाईपलाईन रोडवरील यापूर्वीही एटीएम मशीन चोरांनी फोडलेले आहे. वर्षभरामध्ये एटीएम फोडीच्या अनेक घटना घडल्या आहेत. नगर शहरातील सावेडी उपनगरात वर्षाच्या सुरुवातीलाच दोन एटीएम मशीन फोडून चोरांनी पुन्हा पोलिसांना आव्हान दिले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Related Stories

No stories found.