दोन गावठी कट्टे व सात जिवंत काडतुसह दोघांना श्रीरामपूरात अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
दोन गावठी कट्टे व सात जिवंत काडतुसह दोघांना श्रीरामपूरात अटक

श्रीरामपूर | प्रतिनिधी

श्रीरामपूर शहरात (Shrirampur City) विक्री करण्याचे उद्देशाने दोन गावठी कट्टे बेकायदशिररित्या कब्जात बाळगणारे दोन जणांना अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (Ahmednagar Local Crime Investigation Branch) पथकाने जेरबंद केले.

पोलिसांनी दोन गावठी बनावटी कट्टे व सात जिवंत काडतूसे असे एकूण 63 हजार 500 रुपये रु. किंमतीचे गावठी कट्टे व जिवंत काडतूसे हस्तगत करुन दोघांना अटक केली आहे.

स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने काल श्रीरामपूर शहरातील दहाव्याचा ओटा, नॉर्दन बँच, वार्ड नं. 7, श्रीरामपूर येथे जावून सापळा लावला. त्यानंतर काही वेळातच दोन इसम हे दहाव्याचा ओट्याजवळ येवून सदर ठिकाणी थांबून संशयित नजरेने इकडे तिकडे पाहू लागले.

त्यावेळी पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेवून त्यांना पोलीस स्टाफ व पंचाची ओळख सांगून त्यांना त्यांची नावे पत्ते विचारले असता प्रेम पांडूरंग चव्हाण (वय 37), रा. बाजारतळ, दुबे गल्ली, वॉर्ड नं. 7, श्रीरामपूर, आकाश राजू शेलार, (वय 21) रा. चितळी, ता. राहाता असे असल्याचे सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com