कोयत्याचा धाक दाखवून ट्रक चालकास लुटले

खोसपुरी शिवारातील घटना; 27 हजार लंपास
कोयत्याचा धाक दाखवून ट्रक चालकास लुटले

अहमदनगर| प्रतिनिधी| Ahmednagar

ट्रक चालकास मारहाण (Truck Driver Beating) करत कोयत्याचा धाक दाखवून 27 हजार रूपयांची रोख रक्कम लुटली (Robber). अहमदनगर-औरंगाबाद रोडवरील (Ahmednagar-Aurangabad Road) खोसपुरी (ता. नगर) शिवारात इस्सार पेट्रोलपंपासमोर रविवारी पहाटे ही घटना घडली. मारहाणीत (Beating) ट्रक चालक विठ्ठल रमेश काकडे (वय 30 रा. लोणी व्यंकनाथ ता. श्रीगोंदा) हे जखमी झाले आहेत.

त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून तीन लुटारूंविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल काकडे हे त्यांच्याकडील ट्रक (एमएच 16 सीए 0533) घेऊन अहमदनगर-औरंगाबाद रोडने आळेफाटा येथे जात असताना खोसपुरी (Khospuri) शिवारात त्यांना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी थांबविले.

ट्रकमध्ये प्रवेश करून काकडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांचे ट्रकमध्ये झोपलेले मित्र गौरव गौतम गलबले यांना मारहाण करण्याची धमकी दिली. काकडे यांच्या गळ्यास कोयता लावून त्यांच्या खिशातील 27 हजार रूपयांची रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

Related Stories

No stories found.