जनावर चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक

श्रीगोंदा पोलीसांची कामगिरी
जनावर चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक

श्रीगोंदा | प्रतिनिधी

जनावर चोरीच्या (animal theft) गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यास पोलिसांना (Police) यश आले आहे. आरोपींकडून २ लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. श्रीगोंदा पोलीसांची (Shrigonda Police) ही कामगिरी केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तानाजी गुलाबगिरी गोसावी (रा.रुईखेल ता.श्रीगोंदा) यांच्या गोठ्यातुन २० हजार रुपये किंमतीची ४ ते ५ वर्षे वयाची जर्सी गाय चोरुन नेली होती. त्यांनी याबाबत फिर्याद श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये दिली होती. या प्रकरणाचा तपास करतांना सपोनि. दिलीप तेजनकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हा हा आरोपी शायबाज अन्सार शेख (रा.चिंचोली रमजान ता.कर्जत) याने त्याच्या साथीदारासह केला आहे.

मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे शायबाज अन्सार शेख यांस ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदारा सोबत केला असल्याचे कबुल केले. त्यानंतर रियाज हमीद शेख (रा.रमजान चिंचोली ता.कर्जत) याचा गुन्ह्यात वापरलेला एक छोटा हत्ती गाडी ही जप्त केली आहे. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली गाय आरोपी शोयब सलीम कुरेशी (रा.सिध्दार्थनगर ता.कर्जत) यास विकली असुन ती पुढे त्याने आळेफाटा येथिल बाजारात दहा हजार रुपये किंमतीला विकल्याची सांगत आहे. सदर आरोपींकडुन दहा हहजर रुपये हस्तगत करण्यात आले. सदर गुन्ह्याचा तपास स.फौजदर भानुदास नवले हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com