सावंतसह इतरांवर अ‍ॅट्रोसिटी, जीवे मारण्याचा प्रयत्नाचे वाढीव कलम

ठोकळ कुटुंबियांना मारहाण प्रकरण; पाच आरोपींना अटक
सावंतसह इतरांवर अ‍ॅट्रोसिटी, जीवे मारण्याचा प्रयत्नाचे वाढीव कलम

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

निर्मलनगर येथील ठोकळ कुटुंबियांना मारहाण करणारा सराईत गुन्हेगार दीपक नामदेव सावंत व इतरांविरूद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, अ‍ॅट्रोसिटीच्या वाढीव कलमाची नोंद करण्यात आली आहे.

तोफखाना पोलिसांनी दीपक सावंत, अक्षय उमाकांत थोरवे, तुषार उमाकांत थोरवे, सौरभ वसंत वाघ व शुभम शहादेव बडे या चौघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. याप्रकरणाचा तपास शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

मंगळवारी रात्री साडेदहा वाजता दीपक सावंत व इतरांनी मागील भांडणाच्या कारणातून ठोकळ कुटुंबियांना मारहाण केली होती. यावेळी ठोकळ यांच्या सहा दुचाकी सावंत व इतरांनी जाळून त्याचे नुकसान केले होते. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, दिपक सावंत हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याची आमच्या कुटुंबियांवर दहशत आहे.

त्याच्यासह इतरांविरूद्ध अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करावा,अशी मागणी ठोकळ कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली होती. याची दखल घेत पोलिसांनी दीपक सावंतसह इतरांविरूद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न व अ‍ॅट्रोसिटीचे वाढीव कलम लावले आहे. या गुन्ह्यात दीपक सावंतसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ते सध्या पोलीस कोठडीत असून या गुन्ह्याचा तपास शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com