एमआयडीसी, नागापूर परिसरात चोऱ्या, घरफोड्या वाढल्या

पोलिसांचे दुर्लक्ष; वाईन शॉपी फोडून लाखोंचा ऐवज लंपास
एमआयडीसी, नागापूर परिसरात चोऱ्या, घरफोड्या वाढल्या

अहमदनगर (प्रतिनिधी)-

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून रविवारी रात्री सनफार्मा चौकातील राहुल वाईन शॉप चोरट्यांनी फोडले. या वाईन शॉपमधून सुमारे पाच ते सहा लाख रुपयांची रोख रक्कम व लाखो रुपयांची दारू चोरीला गेली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

एमआयडीसी परिसराचा विस्तार वाढत असून अलिकडच्या काळात चोऱ्या, घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एमआयडीसी पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. रात्रीच्या गस्ती पथकाचे वाहन ठराविक ठिकाणीच उभे राहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. झालेल्या चोऱ्या, घरफोड्यांचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

रविवारी रात्री चोरट्यांनी राहुल वाईन शॉप फोडून रोख रक्कम व दारू चोरून नेली आहे. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली. सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा सुरू होता. यामुळे नक्की किती रक्कम व दारू चोरीला गेली याबाबत माहिती समजली नाही. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com