गावठी कट्टे विक्री करताना दोघांना पकडले

एलसीबीची 'या' टोलनाक्यावर कारवाई
गावठी कट्टे विक्री करताना दोघांना पकडले

अहमदनगर|Ahmedagar

गावठी कट्टा विक्री करताना दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पोलिसांनी (Police) पकडले आहे.

अहमदनगर-जामखेड रस्त्यावरील (Ahmednagar-Jamkhed road) टाकळी काझी (Takali Kazhi) शिवारातील बंद असलेल्या टोल नाक्याजवळ पोलीस निरीक्षक अनिल कटके (Police Inspector Anil Katke) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

गावठी कट्टे विक्री करताना दोघांना पकडले
COVID19 : दिलासादायक! भारतातील सक्रिय रुग्णसंख्या पाच लाखांच्या खाली

संदीप पोपट गायकवाड (वय ४० रा. जांबूत ता. शिरुर जि. पुणे), भारत भगवा हतागळे (वय २५ रा. गोविंदवाडी तलवाडा ता. गेवराई जि. बीड) अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत.

या दोघांकडून दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतूसे व दोन मोबाईल, असा एकूण ८० हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सहाय्यक निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस कर्मचारी गणेश इंगळे, भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेेेठेकर, संदीप घोडके, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, राहुल सोळंके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com