रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी सापडली

तिघे अटकेत, चार पसार
रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी सापडली
रेमडेसिवीर

अहमदनगर (प्रतिनिधी)

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार आजही नगर शहरात सुरू असून एलसीबी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून त्याचा पर्दाफाश केला आहे.

एलसीबीच्या कारवाईत सात जणांची टोळी समोर आली असून त्यातील तिघांना अटक केली आहे. 27 आणि 32 हजार रुपयांना रेमडेसिवीर इंजेक्शन ही टोळी विकत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

Title Name
विखेंचे ‘हवाई रेमडेसिवीर’ : उच्च न्यायालयाने प्रशासनाला फटकारले, विमानतळाचे फुटेज ताब्यात घेण्याचे आदेश
रेमडेसिवीर

हेमंत दत्तत्राय कोहक (रा.बोल्हेगाव), भागवत मधुकर बुधवंत (रा. आदर्श कॉलनी, बोल्हेगाव) आणि आदित्य बाबासाहेब म्हस्के (रा. माताजीनगर, एमआयडीसी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील तारडे हॉस्पिटल परिसरात आणि बोल्हेगावच्या काकासाहेब म्हस्के कॉलेज परिसरात एलसीबी पोलिसांनी ही कारवाई केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com