वयोवृद्ध दाम्पत्याला भामट्याने लुबाडले

भरपेठेत भरदुपारची घटना
वयोवृद्ध दाम्पत्याला भामट्याने लुबाडले

राहुरी (प्रतिनिधी)

तुम्हाला शासनाकडून 20 हजार रुपये मंजूर करून ते बँकेतून काढून देतो. असे सांगून एका अज्ञात भामट्याने वयोवृद्ध दाम्पत्याकडून अडीच तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. ही घटना दि. 19 ऑगस्ट रोजी राहुरी येथील नगर-मनमाड राज्य महामार्गावर भरपेठेत व भरदिवसा दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

वयोवृद्ध दाम्पत्याला भामट्याने लुबाडले
१० लाखासाठी भाडेकरूनेच केला घरमालकाच्या अपहरणाचा प्रयत्न, पण...

या घटनेतील फिर्यादी अन्वर लालभाई शेख (वय 67 वर्षे, रा. सोनार गल्ली, राहुरी) हे दि. 19 ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा बारा वाजे दरम्यान त्यांची पत्नी सोफिया यांच्याबरोबर नगर-मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या स्टेट बँकेसमोर उभे होते. यावेळी एक भामटा त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, तुम्हाला शासनाकडून 20 हजार रुपये मंजूर करून ते बँकेतून काढून देतो. तुम्ही तुमचे आधार कार्ड व पॅनकार्डची झेरॉक्स व दोन सोन्याचे दागिने घेऊन या. ते आपण बँकेच्या साहेबांना दाखवून तुमचे पैसे मंजूर करुन घेऊ, असे बोलबच्चन करून त्या भामट्याने वयोवृद्ध दाम्पत्याला विश्‍वासात घेतले.

वयोवृद्ध दाम्पत्याने त्याच्यावर विश्‍वास ठेवून एक 10 ग्रॅम वजनाचे 20 हजार रुपये किंमतीचे व दुसरे 15 ग्रॅम वजनाचे 30 हजार रुपये किंमतीचे गळ्यातील सोन्याचे गंठण असे एकूण 25 ग्रॅम वजनाचे सुमारे 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन तो भामटा पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अन्वर लालभाई शेख यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्या विरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com