‘या’ तालुक्यात उसात एवढ्या लाखांचा लपवला होता गांजा

साठा चांद्यातील दोघांचा, दोन महिलांना अटक
‘या’ तालुक्यात उसात एवढ्या लाखांचा लपवला होता गांजा

करंजी, चांदा |वार्ताहर| Karanji\Chanda

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) चांदा (Chanda) शिवेलगत व शंकरवाडी (ता. पाथर्डी) येथील उसाच्या (Sugarcane) शेतामध्ये तब्बल 57 लाख 69 हजार 136 रूपयांचा गांजा (cannabis) सोनई (Sonai) व पाथर्डी पोलिसांनी (Pathardi Police) संयुक्तरीत्या कारवाई करत जप्त (Seized) केला. यावेळी दोन महिला आरोपींनाही अटक (women Arrested) करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil), अपर पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधिक्षक दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे यांना मिळालेल्या खबरीनुसार ही कारवाई करण्यात आली.

यावेळी सुमन साहेबराव आवाड, सावित्राबाई बापू आवाड (रा. शंकरवाडी, ता. पाथर्डी) यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे.

शंकरवाडी (Shankarwadi) येथील उसाच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा (Cannabis) लपून ठेवल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत (Secret News) पोलिसांना मिळाली. त्यानुसार सोनई पोलीस ठाणे (sonai Police Station), पाथर्डी पोलिस ठाणे (Pathardi Police Station) व शनिशिंगणापूर पोलीस ठाणे (Shanisignapur Police Station) यांनी संयुक्तरीत्या या ठिकाणी कारवाई (Action) केली. पोलीस (Police) जेव्हा पांढरी पुल शेवगाव (Shevgav) रस्त्यावर मिरीच्या जवळ असलेल्या शंकरवाडी (Shankarwadi) शिवारात पोहोचले तेव्हा त्यांना सुरुवातील काही आढळून आले नाही. पण, नंतर जेव्हा ऊसाच्या फडात जाऊन पाहणी केली असता पोलिसांना (Police) एकच धक्का बसला. ऊसाच्या फडात पोतीच्या पोती गांजाने (cannabis) भरून ठेवलेली होती. उसाच्या शेतात गांजाची (cannabis) पॅकिंग करून ठेवलेली पाकिटे पोलिसांनी जप्त (Police Seized) केली आहे.

721.142 किलो ग्रॅम वजनाचा अंदाजे 57 लाख 69 हजार 136 रूपयांचा हा गांजा (cannabis) आहे. यावेळी दोन महिला आरोपी सुमन साहेबराव आवाड वय-40 वर्षे रा. शंकरवाडी ता.पाथर्डी 2) सावित्राबाई बापु आवाड वय-65 वर्षे रा. शंकरवाडी ता. पाथर्डी यांना अटक करण्यात आली. या महिलांकडे विचारपूस करता सदरचा गांज्याचा साठा हा 1) नारायण भालके (पुर्ण नाव माहिती नाही), 2) बाळासाहेब उर्फ बबन दहातोंडे (पुर्ण नाव माहिती नाही) दोघे रा. चांदा ता. नेवासा जिल्हा-अहमदनगर यांचा असून तो आमचे शेतात ठेऊन 3) बापु आवाड, 4) साहेबराव आवाड, 5) गोरख आवाड, 6) विलास आवाड (सर्व रा. शंकरवाडी ता. पाथर्डी यांना) राखण करण्यास दिला होता असे सांगितले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com