अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दोन जणांविरुद्ध गुन्हा

१ लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दोन जणांविरुद्ध गुन्हा

श्रीरामपूर | प्रतिनिधी

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील खैरी निमगाव (Khairi Nimgoan) येथील अवैध गावठी हातभट्टी दारू (Illegal gavathi liquor) अड्ड्यावर छापा टाकून पोलिसंनी (Police Raid) गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू असा १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी २ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके (Sandip Mitake) यांच्या पथकाने पहाटे ही कारवाई केली.

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील खैरी निमगाव (Khairi Nimgoan) येथे गावठी हातभट्टी दारू (Gavathi Daru) अड्डे व हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना या ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी खैरी निमगाव परिसरातील (Khairi Nimgoan Area) सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश केला.

छाप्यात रमेश धोंडीराम गायकवाड (वय ३५, रा. खैरी निमगाव, ता. श्रीरामपूर) याच्याकडून ४२ हजार रुपये किमतीचे ६०० लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व १५०० रू किमतीची १५ लिटर तयार गावठी हातभट्टी दारू, अर्जुन केशव गायकवाड याच्याकडून ५६ हजार रु. कि.चे ८०० लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व २५०० रू किमतीची २५ लिटर तयार गावठी हातभट्टी दारू असा एकूण १ लाख २ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com