अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोलीस ठाण्यात पॉक्सो गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोलीस ठाण्यात पॉक्सो गुन्हा दाखल

श्रीरामपूर | प्रतिनिधी

श्रीरामपूर शहरातील रामनगर,वार्ड नंबर ०१ या भागात राहणारा आरोपी सद्दाम रशीद शहा,वय ३२ वर्षे, व्यवसाय- भंगारवाला याने रामनगर परिसरातील एका टपरी मध्ये घुसून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात पकडून, मिठी मारून विनयभंग केला. तिने आरडाओरडा केल्याने आरोपी सद्दाम शहा त्या ठिकाणाहुन पळून गेला.

या घटनेनंतर तात्काळ मुलीच्या नातेवाईकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी सद्दाम शहाच्या विरोधात तक्रार दिली. त्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 358/2021 भादवि कलम 354,कलम 08 पॉक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहर पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून आरोपी सद्दाम रशीद शहा याला अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com