चितळीत अल्पवयीन मुलीचा मृतदेह

चितळीत अल्पवयीन मुलीचा मृतदेह

घातपाताचा नातेवाईकांचा संशय

श्रीरामपूर | प्रतिनिधी

परिसरात एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह (minor girl deadbody) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या मुलीचा घातपात झाला असावा, असा संशय तिच्या नातेवाईकांनी केला आहे.

चितळी (Chitali) गावाच्या परिसरात राहणार्‍या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहीती मिळताचा श्रीरामपूर तालुका पोलीस (Shrirampur Police Station) ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी घटनास्थळी भेट देवून मृतदेह ताब्यात घेत श्रीरामपूरला शवविच्छेदनासाठी पाठविला. सदर मुलीचा मृत्यू कशामुळे झाला? याविषयी माहिती मिळू शकली नाही. परिसरातील नागरिक व नातेवाईकांनी गावातील दोन जणांची नावे पोलिसांना सांगितले आहेत. घटनेनंतर ते दोघे पसार झाल्याचे नागरिक सांगत आहेत.

चितळीत अल्पवयीन मुलीचा मृतदेह
भिंगारच्या जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा घातपात झाला असल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्याने तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालयाऐवजी नगर सिव्हील रुग्णालयात करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या घटनेचा उलगडा होईल. तिच्यावर अत्याचार करुन तिचा घातपात करणार्‍यांविरुध्द कारवाई करून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com