बेग गँगच्या साथीदाराला वैजापूरमध्ये ठोकल्या बेड्या

डीवायएसपी संदिप मिटके (DYSP Sandip Mitke) यांच्या पथकाची कारवाई
बेग गँगच्या साथीदाराला वैजापूरमध्ये ठोकल्या बेड्या
Picasa

श्रीरामपूर | प्रतिनिधी

येथील कुप्रसिध्द बेग गँगचा (Beg Gang) पसार असलेला आरोपी गोरख जेधे (Gorakh Jedhe) याला वैजापूर (Vaijapur) येथील एका हॉटेलमधून वैजापूर पोलिसांच्या (Vaijapur Police) मदतीने जेरबंद केले आहे. सदरची कामगिरी श्रीरामपूर (Shrirampur) विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके (DYSP Sandip Mitke)) व त्यांच्या पथकाने केली आहे.

बेग गँगच्या साथीदाराला वैजापूरमध्ये ठोकल्या बेड्या
श्रीरामपुरात गोवंशाचे मांस पकडले; एकाला अटक

येथील बेग गँगचा (Beg Gang Shrirampur) उजवा हात समजला जाणार्‍या गोरख उर्फ विजय मुन्ना जेधे याने अडीच महिन्यापूर्वी श्रीरामपूर शहरातील (Shrirampur City) वॉर्ड नं. 2 मधील शेख नावाच्या तरुणाचा खुनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी गोरख जेधे याचेविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून गोरख जेधे हा पसार होता.

गोरख जेधे हा वैजापूर येथे असल्याची माहिती श्रीरामपूरचे डीवायएसपी संदिप मिटके यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदिप मिटके यांनी स्वतः पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश औटी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ, पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे या पथकाने वैजापूर पोलिसांची मदत घेवून वैजापूर येथील एका हॉटेलमधून गोरख उर्फ विजय मुन्ना जेधे यास शिताफीने अटक केली. याअगादरही त्याचेवर अनेक ठिकाणी खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, मोक्का, दंगल अशा विविध प्रकारच्या गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com