अल्पवयीन मुलीवर अत्याचार; शरीरसंबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी

गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; शरीरसंबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी

बेलापूर | वार्ताहर

येथील एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबध ठेवुन वेळोवेळी बलात्कार केला तसेच मोबाईल मध्ये त्याचे चित्रीकरण केले व ते प्रसारीत करण्याची धमकी देवुन वेळोवेळी शारिरीक संबध ठेवण्यास भाग पाडले. यावरुन एका विरुध्द बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेलापूर येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस रोहीत शाम भिंगारदीवे रा. राजवाडा बेलापुर याने राहत्या घरी बोलावुन प्रेम संबधाचे नाटक करुन शरीर संबध ठेवण्यास भाग पाडले तसेच त्याचे मोबाईल मध्ये चित्रीकरण करुन ते व्हायरल करण्याची धमकी देवुन डिसेंबर २०२० पासुन आजतागायत आरोपीचे राहते घरी तसेच इतर ठिकाणी वेळोवेळी अत्याचार केले.

या बाबतची फिर्यादीवरुन पोलीसांनी रोहीत भिंगारदीवेविरुध्द भादवि कलम ३७६,३५४ पोक्सो बाल लैंगिक अत्याचार कायदा या प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय कृष्णा धायवट हे करत आहे.

Related Stories

No stories found.