
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील वॉर्ड नं. 7, मोरगे वस्ती या भागात दोन मित्र गप्पा मारत बसलेले असताना दारुच्या नशेत एकाच्या डोक्यात बाटली मारुन जखमी केले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहिल पाटेकर याने प्रेम पटेकर यास फोन करुन मोरगेवस्तीतील पाण्याच्या टाकीजवळ बोलावले तेथे गेल्यावर साहिल पाटेकर, गणेश परदेशी व सचिन असे मित्र गप्पा मारत बसले असता. साहिल पाटेकर हा दारु पिलेला होता. बोलता बोलता त्याने प्रेम पटेकर यास शिवीगाळ सुरु केली तेंव्हा प्रेमने त्याला शिवीगाळ करु नको, असे सांगितले असता त्याचा राग येऊन त्याने त्याच्या हातातील काचेची बाटली प्रेमच्या डोळ्यावर मारल्याने प्रेम जखमी झाला. त्यानंतर मित्र गणेश परदेशी व सचिन यांनी पे्रमला साखर कामगार रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात प्रेम संजय पटेकर (वय 20) या तरुणाने फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी साहिल पाटेकर याच्या विरोधात भादंवि कलम 323, 324, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.