
श्रीगोंदा । प्रतिनिधी
श्रीगोंदा शहरातील रहिवासी असलेल्या पाच जणांनी सचिन विठ्ठल जाधव (वय वर्ष 35 राहणार शिक्षक कॉलनी श्रीगोंदा) या तरुणाला कैकाडी गल्ली येथे दारू पिऊन येण्यास मज्जाव करत मारहाण केली. त्या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने या तरुणांचा मृत्य झाला असल्याने या तरुणांच्या भावाच्या फिर्यादी वरून पाच जणांच्या विरोधात श्रीगोंदा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा शहरातील रहिवासी असलेला सचिन विठ्ठल जाधव यास दिनांक 22 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास संत शेख महंमद महाराज पटांगणातील मज्जिद जवळ उभा असताना अक्षय गायकवाड (राहणार वेळु रोड श्रीगोंदा), ऋतिक जाधव (राहणार कैकाडी गल्ली श्रीगोंदा), विशाल गायकवाड (राहणार पंचायत समिती मागे श्रीगोंदा), समीर काझी राहणार महंमद व बापू माने (राहणार शनी चौक श्रीगोंदा) यांनी तू आमच्या गल्लीत दारू पिऊन यायचे नाही. असे म्हणून, शिवीगाळ करत छातीवर, पोटात जोर-जोरात लाथांनी मारहाण केली. तसेच, लाकडी दांडक्याने पाठीवर पायावर तसेच उजव्या पायाच्या खुब्यावर मारहाण करून जखमी केले होते.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेला सचिन जाधव हा 26 मे रोजी सायंकाळी 4:00 वाजण्याच्या सुमारास मयत झाला. म्हणून मयत सचिनचा भाऊ सागर विठ्ठल जाधव (वय वर्ष 19 राहणार शिक्षक कॉलनी, श्रीगोंदा) याने दिलेल्या फिर्यादी वरून पाचही जणांविरोधात खुनासह अन्य कलमांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.