संपत्तीचा वाद टोकाला, सख्ख्या भावाकडून भावावर गोळीबार

जिल्ह्यात कुठे घडली घटना?
संपत्तीचा वाद टोकाला, सख्ख्या भावाकडून भावावर गोळीबार

श्रीगोंदा | प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यातील नगर दौंड महामार्गावर असलेल्या काष्टी मध्ये दोन भावामध्ये झालेल्या वादात एक भावाने पाईपने मारहाण केली तर दुसऱ्या भावाने आपल्याकडील रिव्हॉल्व्हर मधून केलेल्या गोळीबारात दुसरा भाऊ जखमी झाला आहे.

काष्टी येथील संजीवनी हॉस्पीटल समोर दोघा भावांची मारामारी झाली. मनोज मुनोत याने आपल्या भावाला पाईप मारला तर त्यांचे भाऊ डॉ. विजय मुनोत याने आपल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. या गोळीबारात मनोज मुनोत यांना एक गोळी लागली आहे . ही घटना बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली .

याबाबत घटनास्थळी श्रीगोंदा पोलीस निरीक्षक रामराम ढिकले यांच्या सह पोलिसांचे पथक पोहचले असून गोळी लागलेल्या व्यक्ती ला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असून अजून पर्यंत श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com