तहसिलदारांच्या पथकावर हल्ला करणाऱ्या आरोपींची निर्दोष मुक्तता

तहसिलदारांच्या पथकावर हल्ला करणाऱ्या आरोपींची निर्दोष मुक्तता

श्रीगोंदा | प्रतिनिधी

तहसिलदारांच्या पथकावर हल्ला करणाऱ्या आरोपींची न्यायालयाने आरोपातून निर्दोष मुक्तता केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ०४ ऑगस्ट २०१८ रोजी तात्कालीन तहसिलदार महेंद्र माळी, बेलवंडी येथील मंडळाधिकारी परमेश्वर घोडके, हिंगणी दुमाला येथील तलाठी जयसिंग मापारी यांचे पथक सांगवी दुमाला येथील घोडनदी पात्रात गेले असता तेथे त्यांना एक वाळूचा ट्रक बेकायदेशीर वाळू उपसा करताना आढळून आला.

सदरचा ट्रक तहसिल कार्यालय येथे कारवाईसाठी आणण्यासाठी निघाला असता काष्टी येथील बाजार समिती समोर अमोल बाळासाहेब घोगरे (रा . सांगवी दुमाला) व विनोद नानासाहेब घाडगे (रा. इनामगांव) यांनी एकत्रीतपणे सदरच्या महसूल पथकास धक्का बुक्की करुन शिवीगाळ केली. तसेच ट्रकवर डिझेल टाकून तो पेटवुन देण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे नोंदवली.

त्यानुसार सदर इसमाविरुध्द गुन्हयाची नोंद झाली. सदर केसचे कामकाज श्रीगोंदा येथील सत्र न्यायाधीश एन. जी. शुक्ल यांचे समोर चालण्यात येवुन सरकार तर्फे एकुण पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये तत्कालीन तहसिलदार माळी, मंडळाधिकारी घोडके, तलाठी मापारी व तपासी अधिकारी एपीआय विठ्ठल पाटील यांची साक्ष नोंदवण्यात आल्यात .

सदर खटल्याचे गुणदोषावर कामकाज चालुन न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. सदर खटल्यावर महसूल विभाग व इतरांचे लक्ष लागुन होते. सदर आरोपी तर्फे अॅड संग्राम देशमुख यांनी काम पाहिले. त्यांना अॅड . अमोल मांडे, अॅड . विशाल झराड यांनी त्यांना सहाय्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com