धक्कादायक! बहिणीने आत्महत्या केल्याने पत्नीचा कुऱ्हाडीने खून

पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! बहिणीने आत्महत्या केल्याने पत्नीचा कुऱ्हाडीने खून

शिरूर l तालुका प्रतिनिधी

कौटुंबिक वादातून बहिणीने आत्महत्या केल्याने संतप्त पतीने यासाठी पत्नीस जबाबदार धरत तिचा कुऱ्हाडीने घाव घालत खून केला. तर स्वत विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

समीर तावरे असे खून करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. तर मृतामधे पत्नी वैशाली तावरे आणि बहीण माया सातव यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार समीर तवरे यांची बहीण माया व पत्नी वैशाली यांच्यात बुधवारी (ता. 17) रात्री वाद झाला होता. बहीण माया सातव यांनी टोकाचे पाऊल उचलत घराजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

याबाबतची माहिती भाऊ समीर याला कळताच समीर आणि पत्नी वैशाली यांच्यात सकाळी वाद झाला. या वादातून समीर याने वैशाली हिला जबाबदार धरत तीच्यावर कुऱ्हाडीने मानेवर घाव करीत पत्नीलाही संपवले. त्यानंतर स्वतः समीर याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, समीरची प्रकृती सध्या गंभीर आणि चिंताजनक असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैशाली तावरे आणि माया सातव यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. पोलिस तपासानंतरच संपूर्ण घटनेचा उलगडा होणार असून, या दुर्दैवी घटनेने मांडवगण फराटा परिसरात शोककळा पसरली आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com