श्रीरामपूर दरोडा प्रकरणी खळबळजनक खुलासा! दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन पत्नीनेच आवळला पतीचा गळा

सततच्या लैंगिक छळाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल.
श्रीरामपूर दरोडा प्रकरणी खळबळजनक खुलासा! दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन पत्नीनेच आवळला पतीचा गळा

श्रीरामपूर | प्रतिनिधी

बेलापूर-उक्कलगाव रोडवर एकलहरे शिवारात नईम रशीद पठाण या तरुणाचा दरोड्यात खून झाल्याचा बनाव करून त्याच्या पत्नीने त्याचा गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. बुशरा नईम पठाण, वय 27 असे आरोपी पत्नीचे नाव आहे.

घरावर दरोडा टाकून दरोडेखोरांनी सात लाख रुपये लुटून नेतानाच नईम पठाण यांचा खून केला. नईम यांच्या पत्नीलाही जबर मारहाण करण्यात आली असून त्या गंभीर जखमी आहेत. दरोडेखोरांमध्ये एका महिलेचाही समावेश होता, अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र दरोडेखोर आले याचा काही मागमुस पोलिसांना मिळाला नाही. शिवाय इतक्या रात्री बुशराने बंगल्याचा दरवाजा का उघडला? याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी त्या दृष्टीने तपासाची चक्रे फिरवली. नाईन चा मृतदेह बेडवर होता. तेथे झटापट झाल्याची चिन्हे नव्हती. शिवाय त्याच्या पँटच्या खिशातील पाकीट कपाटावर ठेवलेली होते त्यात चाळीस हजार रुपये होते. दरोडेखोरांनी सात लाख रुपये लुटून नेले. मग पाकिटातील चाळीस हजार रुपये का नेले नाही? असाही प्रश्न पडला.

'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. नातेवाईकांची चौकशी केली. नईम ची पत्नी बुशरा हीची चौकशी केली. त्यावेळी तिने दरोड्याचा बनाव करून आपणच खून केल्याची कबुली दिली. पती नईनम वेगवेगळे कृत्य करून तिचा लैंगिक छळ करत असे. त्यामुळे तिने त्याला दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन नंतर खिडकीला साडी बांधून त्याच्या साह्याने गळा वळल्याची कबुली तिने दिली. पोलिसांनी आज सकाळी तिला ताब्यात घेतले आहे.

या महत्त्वपूर्ण आणि रहस्यमय होण्याची उकल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्यासह सहाय्यक फौजदार बाळासाहेब मुळीक, हवालदार मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, अतुल लोटके, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, रवींद्र कर्डिले, सागर ससाने, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, चालक गावडे, महिला पोलीस सरग यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com