राहुरी खुर्दला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

तीन पीडीत महिलांची सुटका || दोन आरोपींवर गुन्हा
राहुरी खुर्दला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
File Photo

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून राहुरी खुर्द (Rahuri Khurd) येथील एका हॉटेलमध्ये (Hotel) चालू असलेल्या सेक्सरॅकेटचा पर्दाफाश (Sex Racket Exposed) केला. यातून तीन पीडीत महिलांची सुटका (Release of Victim Women) करण्यात आली असून याप्रकरणी राहुरी (Rahuri) व श्रीरामपूर (Shrirampur) येथील दोनजणांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. पोलिसांनी टाकलेल्या नियोजनबद्ध धाडसी छाप्यामुळे (Police Raid) राहुरीत अवैध धंदेवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. हा छापा बुधवारी रात्रीच्या सुमारास टाकण्यात आला.

File Photo
धक्कादायक : रस्त्यातच झाली महिलेची प्रसुती

दरम्यान यापूर्वीही याच परिसरातील एका हॉटेलमध्ये (Hotel) चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. मात्र, राहुरी पोलिसांनी त्याकडे अर्थपूर्ण कानाडोळा केल्याने पुन्हा हा व्यवसाय खुलेआम सुरू झाला होता. नगर-मनमाड महामार्गावरील (Nagar-Manmad Highway) अनेक धाब्यांवर सध्या हा व्यवसाय खुलेआम सुरू असून अनेक धाब्यांवर आंबटशौकीनांची गर्दी होत आहे.

File Photo
लसघाबर्‍यांवर आता थेट कारवाईच !

हॉटेलात वेश्याव्यवसाय चालू (Prostitution Continues in the Hotel) असल्याची गोपनीय खबर श्रीरामपूर विभागाचे डीवायएसपी संदीप मिटके (Shrirampur Division DYSP Sandeep Mitke) यांना मिळाली. राहुरीतील हॉटेल न्यू भारत तसेच राहुरी ते शिर्डी रोडवरील हॉटेल न्यू प्रसादच्या शेजारी वेश्याव्यवसाय चालू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्याप्रमाणे राहुरी शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकून तीन पीडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.

महिला कॉन्स्टेबल स्वाती कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सय्यद फरहाद इरशाद अहमद (वय 34, रा. बुवासिंद बाबाचा दर्गा समोर राहुरी), याच्याविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे गुरनं. 24/2022 स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला कॉन्स्टेबल मीना नाचन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजू शिवाजी इंगळे (रा. इंदिरानगर वार्ड नंबर 6, श्रीरामपूर) याच्या विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे गुरनं.25/2022 महिलांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई डीवायएसपी संदीप मिटके, मधुकर साळवे, पो.कॉ. नितीन शिरसाठ, आजिनाथ पाखरे, सचिन ताजणे, गणेश फाटक, इफ्तेकार सय्यद, चा.पो.कॉ. चांद सय्यद, स्वाती कोळेकर, मीना नाचन यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com