सायखिंडी शिवारात तरुणाची हत्या, दोघांविरुद्ध गुन्हा

सायखिंडी शिवारात तरुणाची हत्या, दोघांविरुद्ध गुन्हा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

अज्ञात कारणावरून एका 28 वर्षीय तरुणाचा दोन अज्ञात तरुणांनी चाकूचे वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील सायखिंडी शिवारात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तालुका पोलीस ठाण्यात दोन अज्ञात तरुणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन अरविंद शिंदे (वय 28, रा. मोठेबाबामळा, सायखिंडी, ता. संगमनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत मयताचे वडील अरविंद शिंदे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यामध्ये म्हटले आहे की, दि. 24 एप्रिल 2021 रोजी रात्री 9.25 वाजेच्या सुमारास मोठेबाबामळा वस्तीवर सचिन यास बोलविण्यास दोन तरुण मोटारसायकलहून आले. त्याला बोलावून घेऊन त्यास मोटारसायकलवर बसवून सोबत नेले. सायखिंडी शिवारात सोमनाथ पारधी यांच्या शेतात सचिन याच्यावर धारधार चाकूने मानेवर व डोक्यावर वार करून त्याची निर्घृण हत्या केली.

घटनेची खबर कामगार पोलीस पाटलाने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यास दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना देण्यात आली. तेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलीस अधिकार्‍यांना तपासाच्या दृष्टीने योग्य त्या सूचना केल्या.

अरविंद शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दोन तरुणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 161/2021 भारतीय दंड संहिता 302, 364, 34 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर. एस. सानप हे करत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com