लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

एका समाजाच्या तरुणीसोबत ओळख वाढवून तिला लग्नाचे अमिष दाखवून शहरातील एका युवकाने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका तरुणाविरुध्द बलात्कारासह अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील खांडगाव नजिक ही अत्याचारित तरुणी राहते. गुंजाळवाडी हद्दीत असणार्‍या विडी कामगार सोसायटीसमोर असणार्‍या कृष्णानगर येथील रहिवाशी निलेश नंदकुमार देशमुख याने सदर तरुणीशी ओळख वाढविली. तिला लग्नाचे आमिष दाखवून व वेगवेगळे प्रलोभन दाखवून त्याने 12 ऑगस्ट 2019 ते 18 ऑगस्ट 2020 या कालावधीत इंदिरानगर व कृष्णा नगर परिसरात या तरुणीवर अत्याचार केले. तसेच त्याने जातिवाचक शिवीगाळ करून तिला मारहाण केली.

याबाबत सदर युवतीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी निलेश देशमुख यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे कलम 3(2) (V),3(I) (W)(I) (II) यासह भादंवि कलम 376, 376 (2) (एन), 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित करत आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यास 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com