नगरच्या मंदीरात चोरी करणार्‍या संगमनेरच्या एकास अटक

चोरीचे दागिने विकण्यापूर्वीच ठोकल्या बेड्या
नगरच्या मंदीरात चोरी करणार्‍या संगमनेरच्या एकास अटक

अहमदनगर|Ahmedagar

माळीवाडा (Maliwada) येथील शनिमंदीरातील (Shani Temple) दानपेटी व चांदीचे दागिणे चोरणार्‍या एकाला कोतवाली पोलिसांंनी (Kotwali Police)अटक केली.

नगरच्या मंदीरात चोरी करणार्‍या संगमनेरच्या एकास अटक
करोना बळावतोय! जिल्ह्यात आज सातशेहून अधिक रुग्णांची नोंद; संगमनेर, पाथर्डी टॉपला

रामदास विष्णू सावंत (रा. जांबुत ता. संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. नगर शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात चोरीचे दागिणे विकत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

9 जुलैच्या रात्री शनिमंदीरातील दानपेटी व चांदीचे दागिणे चोरीला गेल्याची फिर्याद अनंत पांडे यांनी कोतवालीत दिली होती. रेल्वेस्टेशन परिसरात एक व्यक्ती चोरीचे दागिणे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळाली होती. त्याठिकाणी पथक पाठवून सावंत याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्याच्याकडून चोरी केलेले चांदीचे दागिणे पोलिसांनी हस्तगत केले आहे. निरीक्षक मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विवेक पवार यांच्या पथकातील पोलीस कर्मचार्‍यांनी ही कामगिरी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com