केळेवाडीत धाडसी घरफोडी, २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लांबविला

सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा आहे मुद्देमाल
केळेवाडीत धाडसी घरफोडी, २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लांबविला

घारगाव | वार्ताहर

संगमनेर तालुक्यातील केळेवाडी येथील सोनबा बाळाजी जाधव यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पोबारा केला आहे.ही घटना सोमवार ता.१९ डिसेंबर रोजी भरदुपारी घडली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बोटा गावांतर्गत असलेल्या वडदरा (केळेवाडी) येथे सोनबा जाधव हे राहात आहे सोमवारी दुपारी अज्ञात चोरट्याने जाधव यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि कपाट उघडून कपाटामधील रोख रक्कम पाच हजार, दीड लाख रूपये किंमतीचे मनी मंगळसुत्र,पन्नास हजारांचे लहान मुलांचे कानातील बाळ्या,गळ्यातील पान, लहाण मुलांची अंगठी,पंचवीस हजारांचे चांदीचे कमरेचे छल्ले असा एकूण २ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून चोरट्याने पोबारा केला आहे.

याप्रकरणी सोनबा जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ४३६/ २०२२ भादवी कलम ४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख हे करत आहे. गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी बोटा परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला असून अनेक शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारीही चोरून नेल्या आहेत. त्यामुळे शेतकरीही वैतागले आहेत. त्यातच आता दिवसा ढवळ्या चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून दोन लाख तीस हजारांचा मुद्देमाल चोरून पोबारा केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com