महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस सिन्नर येथून अटक

मारहाण करीत गळ्यातील सोन्याची चैन घेतली काढून
महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस सिन्नर येथून अटक

तळेगाव दिघे | वार्ताहर

संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका २९ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याच्या व मारहाण करीत सोन्याची चैन काढून घेतल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात संगमनेर तालुका पोलिसांनी सिन्नर येथील श्रीरंग पांडुरंग कटके उर्फ अंकुश पाटील यास अटक केली.

निमोण येथील २९ वर्षीय महिला ही तिच्या बहिणीला भेटण्यासाठी घोटी (ता. इगतपुरी) येथे गेली होती. त्यानंतर ती काळीपिवळी छोटा हत्ती गाडीतून घरी परतत असताना गाडीचालक श्रीरंग पांडुरंग कटके उर्फ अंकुश पाटील ( रा. सिन्नर ) याने काही अडचण असेल, तर सांगत जा असे म्हणत गोड बोलून सदर महिलेचा मोबाइल नंबर घेतला. त्यानंतर तो मोबाइल तिच्याशी वारंवार बोलू लागला. त्याने तिच्या जीवनामधील काही गोष्टी जाणून घेतल्या. त्यानंतर आरोपी श्रीरंग कटके याने तुझ्या मोबाइलमधील सर्व डाटा माझ्या मोबाइलमध्ये घेतला आहे. तू जर माझ्याशी शरीर सबंध ठेवले नाही, तर तुझे फोटो तुझी बहीण व मेव्हणे यांना दाखवीन व व्हायरल करीन अशी धमकी देत इच्छेविरुद्ध पिडीत महिलेवर वारंवार अत्याचार केला तसेच अनैसर्गिक कृत्य केले. त्याशिवाय लोखंडी गजाने मारहाण करून पाण्याच्या जारची व स्कुटीची तोडफोड केली. पिडीत महिलेच्या गळ्यातील अकरा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन काढून घेतली.

याप्रकरणी पिडीत महिलेने फिर्याद पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी श्रीरंग पांडुरंग कटके उर्फ अंकुश पाटील ( रा. सिन्नर ) याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अत्याचारसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. त्यानंतर संगमनेर तालुका पोलिसांनी आरोपीस मंगळवारी सिन्नर येथून ताब्यात घेत अटक केली. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. एस. सानप अधिक तपास करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com