जिवे मारण्याची धमकी देणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जिवे मारण्याची धमकी देणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

पोलीस ठाण्यात विरोधात तक्रार देतो का? असे म्हणत एका जणास बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देणार्‍या तिघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबासाहेब प्रभाकर कांदळकर, सचिन रामनाथ दिघे व मतीन चाँदभाई शेख (सर्व रा. तळेगाव दिघे, ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. रामदास कारभारी दिघे हे दि. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास गावातील ऊसाचे गट ऑफिससमोरुन जात असतांना तेथे बाबासाहेब कांदळकर, सचिन दिघे व मतीन शेख हे आले. त्यांनी रामदास दिघे यांना अडवून तु जास्त शहाणा व गावचा बाप झाला आहे का? आमच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देतो का? असे म्हणून रामदास दिघे यांना शिवीगाळ केली. व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी सचिन दिघे याने त्याच्या हातातील चाकूने रामदास दिघे याच्या डाव्या हाताच्या कांबीवर मारुन दुखापत केली. तेथून रामदास दिघे हे घरी गेले असता आरोपी पुन्हा दिघे यांच्या घरी गेले. तेथे जावून फिर्यादी यास शिवीगाळ करुन त्याच्या पत्नी व भावजयी हीस देखील शिवीगाळ केली. फिर्यादी यास पकडून घराबाहेर ओढत आणून चल तुझे तुकडे तुकडे करतो, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत रामदास कारभारी दिघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील तिघाजणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 426/2022 भारतीय दंड संहिता 452, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खंडीझोड करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com