घरात राहण्याच्या कारणावरून लोखंडी रॉडने मारहाण करून सामानाची तोडफोड

तीन जखमी, 18 जणांविरुद्ध गुन्हा
घरात राहण्याच्या कारणावरून लोखंडी रॉडने मारहाण करून सामानाची तोडफोड

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

घरात राहायचे नाही या कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना शहरातील अकोले नाका परिसरात शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या हाणामारीत तीन जण जखमी झाले असून 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या झटापटीमध्ये घरातील सामानाची तोडफोड करून एका महिलेचा विनयभंग झाला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, फिर्यादी यांची मुले, सुना भाडोत्री रूममध्ये गोल्डन सिटी संगमनेर येथे राहत होते. नंतर त्यांनी सदर रुम खाली करून ते पुन्हा फिर्यादी यांच्या घरी आले. तेथे जया सूर्यवंशी, मधुरा सूर्यवंशी, पुनम माळी, इंदुबाई सूर्यवंशी, परीघा सूर्यवंशी, सुशाबाई बर्डे, भुमिका माळी, साक्षी सूर्यवंशी, पायल माळी, श्रद्धा सूर्यवंशी, उज्वला सूर्यवंशी, साई सूर्यवंशी, आदित्य सूर्यवंशी, गणेश माळी, गोकुळ सूर्यवंशी, अतुल सूर्यवंशी, सिद्धार्थ सूर्यवंशी, शरद सूर्यवंशी (सर्व रा. अकोले नाका, संगमनेर) यांनी येऊन तुम्ही येथे राहायचे नाही, तुम्ही येथे राहीले तर तुम्हाला जाळून टाकू, अशी धमकी दिली.

साई सूर्यवंशी व आदित्य सूर्यवंशी यांनी फिर्यादीचे पती यांना लोखंडी रॉडने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. व साक्षीदार यांना घरात घुसून लाथाबुक्क्याने मारहाण करून घरातील एलईडी टीव्ही, फर्निचर व इतर सामानांची तोडफोड करून सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे नुकसान केले. यावेळी दोघांनी उपस्थित महिलेचे मिनीगंठण ओढून नेऊन विनयभंग केला. या मारहाणीत तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सदर महिलेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी जया सूर्यवंशी, मधुरा सूर्यवंशी, पुनम माळी, इंदुबाई सूर्यवंशी, परीघा सूर्यवंशी, सुशाबाई बर्डे, भुमिका माळी, साक्षी सूर्यवंशी, पायल माळी, श्रद्धा सूर्यवंशी, उज्वला सूर्यवंशी, साई सूर्यवंशी, आदीत्य सूर्यवंशी, गणेश माळी, गोकुळ सूर्यवंशी, अतुल सूर्यवंशी, सिद्धार्थ सूर्यवंशी, शरद सूर्यवंशी (सर्व राहणार अकोले नाका, संगमनेर) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महाले करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com