लग्नाच्या वरातीत नाचण्यावरुन झालेल्या वादातून कुर्‍हाडीने हल्ला, दोघे गंभीर

लग्नाच्या वरातीत नाचण्यावरुन झालेल्या वादातून कुर्‍हाडीने हल्ला, दोघे गंभीर

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून एकाने दोघांवर कुर्‍हाडीने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाल्याची घटना 25 एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारातील बिडी कामगार वसाहत जवळ घडली.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, गुंजाळवाडी परिसरात ऐश्वर्या पेट्रोल पंपाच्या मागे 25 एप्रिल रोजी रात्री एका लग्नाची वरात सुरू होती. या वरातीमध्ये नाचत असतांना धक्का लागल्याचे कारणावरून दिनेश डहाळे व इतरांमध्ये किरकोळ वाद झाला. वरातीत झालेल्या वादाबाबत समजावून सांगत असल्याचा दिनेश डहाळे यास राग आल्याने त्याने हातातील कुर्‍हाड दोघांच्या डोक्यात मारली. या हल्ल्यातत चेतन राजेंद्र भडांंगे (वय 24) व नितीन रमेश वाघ (रा. गुंजाळवाडी) हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले.

याबाबत कृष्णा राजेंद्र भडांगे (राहणार बिडी कामगार वसाहत) यानेे दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दिनेश डहाळे (राहणार बिडी कामगार वसाहत संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 297/2022 भारतीय दंड संहिता कलम 326, 324 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलिस करत आहे.

Related Stories

No stories found.