राजापूरच्या संभाजी हासेंना मारहाण, 7 जणांविरुद्ध गुन्हा

राजापूरच्या संभाजी हासेंना मारहाण, 7 जणांविरुद्ध गुन्हा

संगमनेर (प्रतिनिधी)

रस्त्यात टाकलेली लाकडे बाजूला करणार्‍यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संभाजी माधव हासे (वय 52, राहणार राजापुर, ता. संगमनेर ) हे मंगळापूर शिवारातून गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास आपल्या वाहनातून चालले होते. त्यावेळी रस्त्यात लाकडे पडलेली होती. हासे हे वाहनातून खाली उतरले. त्यांनी लाकडे बाजुला केली.

त्यावेळी एकनाथ गणपत धुमाळ व त्यांची पत्नी, अनिल एकनाथ धुमाळ, लता अनिल धुमाळ, सोमनाथ दगडू हासे, शाहु अनिल डावरे, अनिल डावरे यांनी तेथे येत संभाजी हासे यांना शिवीगाळ केली. शाहू अनिल डावरे याने संभाजी हासे यांच्या कपाळावर हातातील कड्याने मारले व त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चैन हिसकावून घेतली. तर अनिल डावरे याने हासे यांचा हात पिरगळत बोटातील सोन्याची अंगठी काढून घेतली. व त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत संभाजी हासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील सात जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 460/2021 भारतीय दंड संहिता 143, 147, 149, 323, 327, 504, 506 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महाले करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com