नगरमध्ये रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची 'या' ठिकाणी कारवाई; तिघे अटकेत, चार पसार
नगरमध्ये रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद

अहमदनगर|Ahmedagar

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे पुन्हा समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर शहरात दोन ठिकाणी कारवाई करून काळाबाजार करणार्या तिघांना अटक केली आहे. या कारवाईत सात जणांची टोळी समोर आली असून चौघे पसार झाले आहे. 27 आणि 32 हजार रुपयांना रेमडेसिवीर इंजेक्शन ही टोळी विकत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

हेमंत दत्तत्राय कोहक (वय 21 रा. बोल्हेगाव), भागवत मधुकर बुधवंत (वय 20 रा. आदर्श कॉलनी, बोल्हेगाव) आणि आदित्य बाबासाहेब म्हस्के (वय 21 रा. माताजीनगर, एमआयडीसी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून तीन इंजेक्शन, मोबाईल व एक चारचाकी वाहन असा सात लाख 32 हजार 850 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील तारडे हॉस्पिटल परिसरात आणि बोल्हेगावच्या काकासाहेब म्हस्के कॉलेज परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली.

Title Name
डॉ.तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष रावसाहेब साबळे यांचे निधन
नगरमध्ये रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद

औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक विवेक खेडकर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध तर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. महेश दशरथ मते, प्रदीप मारूती मगर, अमर शिंदे (तिघे रा. तपोवन रोड, नगर), अंकित कालिका मोर्य (रा. गुरूकृपा कॉलनी, एमआयडीसी) हे पसार झाले आहेत.

काही व्यक्ती रेमडेसिवीर इंजेक्शनची जास्त दराने विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. औषध प्रशासनाचे निरीक्षक खेडकर यांच्यासह गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, मिथून घुगे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोलीस कर्मचारी विश्वास बेरड, संदीप घोडके, सुरेश माळी, शंकर चौधरी, सागर ससाणे, रवींद्र घुगासे, मयूर गायकवाड यांचे पथक तयार करण्यात आले. दोन्ही ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com