पुनतगाव येथे दोन ठिकाणी दरोडा; सोने-चांदीसह रोख रक्कम लंपास

पुनतगाव येथे दोन ठिकाणी दरोडा; सोने-चांदीसह रोख रक्कम लंपास

पाचेगाव | वार्ताहर

नेवासा तालुक्यातील पुनतगाव पाचेगाव रस्त्यालगत शेतीत वस्ती करून राहणारे अशोक कारखान्याचे मा.संचालक मच्छिंद्र सुखदेव वाकचौरे व त्याचा पुतणे प्रसाद विठ्ठल वाकचौरे यांच्या घरावर रात्री पावणे तीन सुमारास सहा दरोडेखोराने दरोडा टाकला.

त्यात जवळपास साडे तीन तोळे सोने व अठरा हजार रोख रक्कम तसेच सात भार चांदी चोरीला गेल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी नेवासा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी भेट देऊन सदर घटनेची माहिती घेतली. घटनास्थळी शवनपथक पचारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

रात्री वेळेस पाच ते दहा दरोडेखोरानी घरचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व घरातील व्यक्तींना कोयता, चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी चोरी केली. सदर घटनेत चोरट्यांनी कोणालाही जखमी केले नाही.

रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणताही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तरी पुढील तपास नेवासा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार हे करीत असल्याचे समजले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com