तलवारीचा धाक दाखवत बसचालकाच्या घरावर दरोडा

तलवारीचा धाक दाखवत बसचालकाच्या घरावर दरोडा

९३ हजारांचा ऐवज घेऊन दरोडेखोर लंपास

जामखेड | तालुका प्रतिनिधी

जामखेड शहरातील बीड रोडलगतच्या शिक्षक कॉलनी येथे अज्ञात चोरटयांनी एस.टी. चालक विजय खुपसे यांना तलवारीचा धाक दाखवत घरातील ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्या प्रकरणी ५ अज्ञात दरोडेखोरांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तलवारीचा धाक दाखवत बसचालकाच्या घरावर दरोडा
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फीर्यादी बसचालक विजय नवनाथ खुपसे (रा . शिक्षक कॉलनी, जामखेड) हे रात्री घरात झोपलेले असताना दि २७ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात ५ दरोडेखोरांनी त्यांच्या स्वयंपाकघराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

तलवारीचा धाक दाखवत बसचालकाच्या घरावर दरोडा
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

फिर्यादीस तलवारीचा धाक दाखवून घरातील बेडरुममध्ये जाऊन कपाट तोडुन कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ९३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. यानुसार बसचालक विजय खुपसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ५ अज्ञात दरोडेखोरांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तलवारीचा धाक दाखवत बसचालकाच्या घरावर दरोडा
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

दरम्यान घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात हे करत आहेत.

तलवारीचा धाक दाखवत बसचालकाच्या घरावर दरोडा
१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण : 'या' तारखेपासून CoWIN वर करता येणार नोंदणी
तलवारीचा धाक दाखवत बसचालकाच्या घरावर दरोडा
'या' ड्रामा क्वीनची Bigg Boss च्या घरातून एक्झिट

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com