मनोरुग्ण तरुणीवर नगरमध्ये अत्याचार
सार्वमत

मनोरुग्ण तरुणीवर नगरमध्ये अत्याचार

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

वर्धा जिल्ह्यातील एका युवतीवर नगर शहरातील कल्याण रोडवर अत्याचार झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार करणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभय बाबुराव कडू (रा. सिंहगड रोड, पुणे) असे या व्यक्तीचे नाव आहे. नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या डॉ. सुचिता धामणे यांनी फिर्याद दिली आहे.

अत्याचार झालेली युवती मुळची वर्धा जिल्ह्यातील आहे. ती मनोरुग्ण असल्याने वर्धा येथून निघून आली. तिचा संपर्क अभय कडू याच्याशी आला. कडू याने त्याच्या वाहनामध्ये बसून युवतीला पुणे येथे नेले. यानंतर तो तिला घेऊन पुणे येथून नगरमध्ये सोमवारी पहाटे दाखल झाला. कल्याण रोडवरील रेल्वे ब्रीजजवळ कडू याने युवतीवर त्याच्या वाहनामध्ये अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे या युवतीला तेथेच सोडून तो निघून गेला.

ही युवती सोमवारी नगर शहरामध्ये नग्न अवस्थेत फिरत असताना काही लोकांच्या निदर्शनास आली. याबाबतची माहिती शिंगवे येथील माऊली प्रतिष्ठानला देण्यात आली. एका रुग्णवाहिकेतून या युवतीला माउली प्रतिष्ठानमध्ये दाखल केले. तिच्यावर त्याठिकाणी उपचार सुरू आहे.

याची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरूण मुलाणी, सहाय्यक निरीक्षक किरण सुरसे यांना मिळाली. त्यांनी शिंगवे येथे जाऊन युवतीची विचारणा केली. तिचा जबाब नोंदविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती शुद्धीवर नसल्याने पोलिसांचे पथक माघारी परतले.

माऊली प्रतिष्ठानचे डॉ. धामणे यांच्याकडून या युवतीवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना तिने मंगळवारी सर्व घटनाक्रम डॉ. धामणे यांना सांगितला. यानंतर डॉ. धामणे यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी अभय कडू याला अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com