दुचाकी चोरणारा राहुरीचा तरूण अटकेत

चार दुचाकी हस्तगत; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
दुचाकी चोरणारा राहुरीचा तरूण अटकेत

अहमदनगर (प्रतिनिधी)

दुचाकी चोरी करणार्‍याला अटक करून त्याच्याकडून दोन लाख रूपये किंमतीच्या चार चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. रवी रामदास नेटके (वय 35 रा. गोटुंबे आखाडा ता. राहुरी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

एमआयडीसी परिसरात दुचाकी चोर्‍यांचे वाढते प्रमाण लक्षात घेवुन सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांचे आदेशाने पोलीस अंमलदार नंदकुमार सांगळे, सुरेश सानप, नवनाथ दहीफळे हे परिसरात चोरट्यांचा शोध घेत असताना नगर-मनमाड रोडवर सनफार्मा चौक येथून एक संशयीत इसम मोपेड दुचाकीवर येताना दिसला.

त्यास थांबवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव रवी रामदास नेटके असे सांगितले. त्यास त्याचे जवळील होन्डा अ‍ॅक्टीवा दुचाकीबद्दल विचारले असता त्याने ती चोरीची असुन सदर गाडी ही त्याने पुणे भोसरी एमआयडीसी परीसरातुन चोरून आणली असल्याचे समोर आले आहे. त्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरलेल्या एकुण चार दुचाकी पोलिसांना दिल्या आहेत. पोलिसांनी त्या हस्तगत केल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com