डोक्यात लाकडी दांडा मारून जिवे मारण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

या तालुक्यातील घटना
डोक्यात लाकडी दांडा मारून जिवे मारण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात लाकडी दांडा मारून रवींद्र म्हसे या तरूणाला गंभीर जखमी (Youth Injured) करण्यात आले. राहुरी (Rahuri) तालुक्यातील शिलेगाव (Shilegav) येथे दिनांक 19 जानेवारी घडलेल्या घटने पासून रवींद्र म्हसे या तरूणावर अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

डोक्यात लाकडी दांडा मारून जिवे मारण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल
इगतपुरी तालुक्यातील शाळेच्या सहलीच्या बसला अपघात

राहुरी (Rahuri) तालुक्यातील शिलेगाव येथील महादेव मंदिराजवळ सप्ताहचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा रात्री नऊ वाजे दरम्यान जेवणाच्या पंगती चालू असताना रवींद्र प्रभाकर म्हसे हा जेवण करीत असताना त्यावेळी आरोपी सौरभ तागड याने रवींद्र प्रभाकर म्हसे याच्या डोक्यात लाकडी दांड्याने जबर मारहाण (Beating) केली. त्यामुळे तो जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडला.

डोक्यात लाकडी दांडा मारून जिवे मारण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल
प्रशासन सुधारण्यासाठी अभिप्रायांचा आधार

त्याच्या नातेवाईकांनी त्याला तात्काळ अहमदनगर (Ahmednagar) येथील रूग्णालयात उपचारासाठी नेले. त्याच्या तब्बेतीत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याचे नातेवाईकांकडून समजले. सुमन प्रभाकर म्हसे, वय 45 वर्षे, रा. शिलेगाव, ता. राहुरी. यांच्या फिर्यादीवरून आरोपी सौरभ भाउसाहेब तागड, राहणार शिलेगाव, ता. राहुरी. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. 307 प्रमाणे जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलिस (Rahuri Police) करीत आहे.

डोक्यात लाकडी दांडा मारून जिवे मारण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल
गुजरातच्या भामट्याला नगर सायबरकडून अटक; काय आहे प्रकरण?
डोक्यात लाकडी दांडा मारून जिवे मारण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल
निळवंडे कालव्यांच्या कामास आता मुदतवाढ नाही
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com