तुरुंगात भेटायला आले नाही म्हणून कोंढवडच्या बापलेकांवर कोयत्याने वार

तुरुंगात भेटायला आले नाही म्हणून कोंढवडच्या बापलेकांवर कोयत्याने वार

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

मी जेलमध्ये असताना तुम्ही मला भेटायला का आले नाहीत? असे म्हणून दोघा बापलेकांना दीपक नवले याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कोयत्याने वार केला. राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे दि. 8 मे रोजी ही घटना घडली आहे.

हरिभाऊ तात्याबा नवले, वय 46 वर्षे, रा. कोंढवड, ता. राहुरी यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 8 मे रोजी सायंकाळी हरिभाऊ नवले व त्यांचा मुलगा कोंढवड येथील त्यांच्या घरासमोर होते. त्यावेळी आरोपी दीपक भीमराज नवले हा दारू पिऊन तेथे आला. हरिभाऊ नवले यांच्या मुलास म्हणाला, मी राहुरीच्या जेलमध्ये असताना तुम्ही मला भेटायला का आले नाहीत? असे म्हणून त्याने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेव्हा हरिभाऊ नवले हे भांडण सोडविण्यासाठी आले असता आरोपी दीपक नवले याने त्यांच्यावर कोयत्याने वार केला. या घटनेत हरिभाऊ नवले हे जखमी झाले असून त्यांच्यावर राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हरिभाऊ नवले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी दीपक भीमराज नवले रा. कोंढवड, ता. राहुरी याच्या विरोधात गु. रजि. नंबर 384/2022 भादंवि. कलम 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार महादेव शिंदे करीत आहेत.

Related Stories

No stories found.