राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

मुतखड्याच्या औषधात गुंगीचे औषध टाकून येवला तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर राहुरी येथे बलात्कार झाल्याची घटना घडली.

बलात्काराचे फोटो व व्हिडिओ काढून वारंवार बलात्कार केल्यामुळे राहुरी पोलिसात राधाकिसन बडदे याच्या विरोधात पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील फिर्यादी 17 वर्षीय मुलगी ही नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील रहिवाशी आहे. दि. 5 सप्टेंबर 2018 रोजी फिर्यादी अल्पवयीन मुलीला मुतखड्याचा त्रास होऊ लागल्याने ती राहुरी शहरातील तनपुरेवाडी-खळवाडी येथील राधाकिसन रायभान बडदे याच्याकडे आली. मुतखड्याचा त्रास जाणवत असल्याने यातील आरोपी बडदे याने मुतखड्याचे औषध आहे.

असे सांगून कोणतेतरी गुंगीचे औषध पाजून फिर्यादी ही झोपेत असताना फिर्यादीचे कपडे काढले. तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढून तिच्याशी बळजबरीने शारीरीक संबंध ठेवले. फिर्यादीचे व्हीडीओ काढून त्या फोटोच्या व व्हीडीओ शुटींगच्या आधारे वेळोवेळी तिला धमकावले.

तसेच त्या मुलीचे वडील, भाऊ व नवरा यांचे मोबाईलवर फिर्यादीचे नग्न अवस्थेतील फोटो व शारिरीक संबंधाबाबतचे व्हिडीओ पाठवले आणि त्या मुलीची बदनामी केली. अशा प्रकारे 5 सप्टेंबर 2018 ते 16 डिसेंबर 2019 दरम्यान आरोपी राधाकिसन बडदे याने राहुरी येथील त्याच्या राहात्या घरात, कधी येवला तालुक्यातील तिच्या माहेरी तसेच तिच्या सासरी अशा विविध ठिकाणी तिच्यावर वेळोवेळी शारिरीक अत्याचार केला आहे.

या घटनेतील पीडीत मुलगी आज 19 वर्षाची सज्ञान झाली असून तिने स्वतः राहुरी पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार राधाकिसन रायभान बडदे (वय 40 वर्ष) याच्या विरोधात बलात्कार व पोस्कोसह आयटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे हे स्वतः करीत आहेत. या घटनेतील आरोपी याला राहुरी पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घेऊन अटक केली आहे.