राहात्यातील दोघांना १० लाखांना गंडवले

लंडनमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी व्हिसा काढून देतो...
राहात्यातील दोघांना १० लाखांना गंडवले

राहाता (वार्ताहर)

लंडन येथे नोकरी मिळवून देण्यासाठी व्हिसा काढून देतो व घर घेण्यासाठी मदत करतो असे सांगून राहत्यातील दोन व्यक्तींची १० लाख ११ हजारांची फसवणूक केल्याची घटना राहाता शहरात घडली. बाळासाहेब हरकू गमे यांनी राहाता पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक केलेल्या व्यक्ती विरोधात ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला असून कुटुंबासहित पसार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

राहात्यातील दोघांना १० लाखांना गंडवले
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

या घटनेबाबत बाळासाहेब गमे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी जस्ट डायल या कंपनीशी संलग्न असून ही कंपनी हॉटेल बुकिंग, प्लॉटिंग व इतर खरेदी विक्रीचे व्यवहार मध्यस्थी म्हणून काम करते. कंपनीने माझा नंबर थ्री स्टार, फोरस्टार या हॉटेलला दिला असून हॉटेलमार्फत गरजू व लोक मदतीसाठी मला संपर्क करीत असतात. १७ मार्च २०२० रोजी कोविडच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे राज्यात कडक लॉकडाऊन पडला त्यामुळे राज्य शासनाने हॉटेल तात्काळ खाली करण्याचे आदेश दिले.

राहात्यातील दोघांना १० लाखांना गंडवले
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

शिर्डी येथील एका हॉटेल मधील ग्राहक म्हणून आलेले भूषण कुमार अग्रवाल व रितु अग्रवाल दोघे राहणार सोनीपत हरियाणा यांनी माझ्या हेल्पलाईनला दिलेल्या फोन नंबरला माझ्याबरोबर संपर्क करून मला मदतीची मागणी केली. म्हणून मी दिनांक १७ मार्च २०२० रोजी दुपारी १ वाजता त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने हॉटेल येथे गेलो. त्यावेळी भूषण व त्याची पत्नी रितू यांनी आता लॉकडाऊन झाल्याने हॉटेल बंद होणार आहे आम्हाला हॉटेल रूम खाली करायचा आहे तुम्ही आम्हा नवरा बायकोला काहीतरी पर्यायी व्यवस्था करा असे सांगितल्याने मी त्यांना शिर्डी ते निमगाव येथील साईशरणम कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट भाडे तत्त्वावर घेऊन दिला. परंतु रितु यांचे वजन खूप असल्याने व त्यांना पायांचा आजार असल्याने त्या ठिकाणी लिफ्ट लांब असल्यामुळे त्यांनी दुसरा फ्लॅट मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

राहात्यातील दोघांना १० लाखांना गंडवले
भाग्यश्रीच्या मनमोहक अदांची चाहत्यांना पडली भुरळ, पाहा फोटो

माझे त्यांच्याकडे जाणे-येणे असल्याने मी त्यांची अडचण जाणून घेऊन राहाता येथील लिफ्ट असलेले शिवमुद्रा टॉवर मधील बाळासाहेब घन्सी गमे यांचा फ्लॅट भाडेतत्त्वावर घेऊन दिला. माझे राहाता येथील त्यांच्या फ्लॅटवर जाणे-येणे असल्याने कोल्हार येथील माझा भाचा स्वप्नील अनिल मोरे याचेही रितू व भूषण यांच्याशी परिचय झाला. त्यांनी माझा भाचा याला विचारले तू काय काम करतोस तेव्हा त्याने माझा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झाला आहे. त्यावेळी अग्रवाल दाम्पत्य त्याला म्हणाले आमचे नातेवाईक लंडनमध्ये आहेत. तिथे तुला आम्ही नोकरी मिळवून देऊ शकतो. परंतु तुला वर्क परमिट व्हिसासाठी ५ लाख ३८ हजार रुपये द्यावे लागतील. त्यांनी माझा व माझ्या भाच्याबरोबर विश्वास संपादन केला असल्यामुळे मी २ लाख १८ हजार स्वप्निल यास रितू व भूषण अग्रवाल यांना देण्याचे सांगितले. दिनांक २४ ऑक्टोबर रोजी राहाता येथे राहत असलेल्या फ्लॅटमध्ये रक्कम आणून दिली.

राहात्यातील दोघांना १० लाखांना गंडवले
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

त्यानंतर ते म्हणाले की, डिसेंबर महिन्यात तुमचा भाचा स्वप्नील याला लंडनमध्ये जाण्यासाठी व्हिसा व नोकरीचे लेटर मिळून जाईल. दिनांक १० डिसेंबर रोजी ते म्हणाले आमचे मुंबई येथे प्लॉटिंग संदर्भात काम आहे. आम्ही १५ डिसेंबरपर्यंत मुंबई येथे जाऊन येतो. असे सांगून मुंबई येथे गेले. आम्ही १४ डिसेंबर रोजी भूषण व रितू अग्रवाल यांना फोन द्वारे संपर्क केला असता त्या दोघांचे मोबाईल बंद मिळून आले. त्यानंतर १५ डिसेंबर रोजी शिवमुद्रा अपार्टमेंट येथे फ्लॅट मालक बाळासाहेब गमे यांच्याकडून त्या फ्लॅटची दुसरी चावी घेऊन फ्लॅट उघडून पाहिला तर अग्रवाल दाम्पत्यांनी घरातील सर्व सामान गायब करून आमची फसवणूक केली असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यानंतर या दोघांनी अजून कोणा कोणाची फसवणूक केली याबाबत आम्ही अधिक चौकशी केली असता. त्यांच्याकडे काम करणारी रंजना निकाळे यांनाही घर घेऊन देतो असे सांगून त्यांची ७ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याचे रंजना निकाळे यांच्याकडून समजले तेही भूषण व रितू अग्रवाल यांचा शोध घेत आहेत. राहाता पोलिसांत बाळासाहेब गमे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे करीत आहेत.

राहात्यातील दोघांना १० लाखांना गंडवले
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

Related Stories

No stories found.