कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, २२ जनावरांची सुटका

शहरात बेकायदेशीर कत्तलखाने मोठ्या प्रमाणात सुरू
कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, २२ जनावरांची सुटका

संगमनेर | शहर प्रतिनिधी

संगमनेरातील जमजम कॉलनी (Jamjam Colony sangamner) येथील कत्तलखान्यावर (slaughterhouse) शहर पोलिसांनी (Police) छापा टाकून कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या २२ गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार झाला आहे.

कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, २२ जनावरांची सुटका
करोना बळावतोय! जिल्ह्यात आज सातशेहून अधिक रुग्णांची नोंद; संगमनेर, पाथर्डी टॉपला

शहरातील जमजम कॉलनी परिसरात कत्तलीसाठी जनावरे बांधून ठेवल्याची माहिती पोलिसांना समजली. या माहितीवरून पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जमजम कॉलनी परिसरातील अब्दुल वाहिद करीम कुरेशी यांच्या वाड्यावर छापा टाकला. या वाड्यामध्ये २२ गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी पंचनामा करून या जनावरांची सुटका केली. पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपी फरार झाला. एकूण 4 लाख 7 हजार रुपयांची जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यांची रवानगी पांझरपोळ येथे केली आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अविनाश बर्डे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अब्दुल वाहिद करीम कुरेशी (रा. जमजम कॉलनी, संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 367/2021 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5 (अ), 1, 9 तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंध कलम 3, 11 अन्वये दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आशिष आरवडे हे करीत आहे.

कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, २२ जनावरांची सुटका
विजेचा धक्‍का लागून युवकाचा मृत्यू

संगमनेर शहरात बेकायदेशीर कत्तलखाने मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. पोलिसांनी अनेकदा कारवाई करूनही कत्तलखाने सुरूच राहतात. गोमांस विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत असून या व्यवसायात अनेक जणांचा सहभाग आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com