नगर : पोलीस निरीक्षकाकडून तरूणीवर अत्याचार

नगर शहरातील घटना; जिल्हा पोलीस दलात खळबळ
नगर : पोलीस निरीक्षकाकडून तरूणीवर अत्याचार

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे असलेले

विकास वाघ यांच्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. नगर शहरातील तरूणीने त्यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, नगर शहरातील एक तरूणी 2019 मध्ये कोतवाली पोलीस ठाण्यात एका गुन्ह्या संदर्भात फिर्याद दाखल करण्यासाठी गेली होती. यावेळी कोतवाली पोलीस ठाण्यात विकास वाघ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्या तरूणीकडून मोबाईल नंबर घेतला. यानंतर निरीक्षक वाघ यांनी पदाचा गैरवापर करून तरूणीला वेळोवेळी फोन करून त्रास देण्यास सुरूवात केली.

निरीक्षक वाघ यांनी तरूणीच्या घरी जाऊन बंदुकीचा धाक दाखवून तिच्या इच्छेविरूद्ध अत्याचार केला. यातून पिडीत तरूणी गर्भवती राहिली. यानंतर वाघ यांनी पिडीत तरूणीला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात घडून आणला. यानंतरही वाघ हे राहत असलेल्या सरकारी बगल्यावर पिडीत तरूणीवर अत्याचार करत व तिला मारहाण करत असे. एप्रिल 2020 मध्ये पिडीत तरूणीने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देण्यासाठी गेली.

याबाबतची माहिती निरीक्षक विकास वाघ यांना मिळाल्यानंतर त्यांनी पिडीत तरूणीला एमआयडीसी परिसरात घेऊन जात बिअरची बाटली गळ्याला लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर पिडीत तरूणीने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. हे निरीक्षक वाघ यांना कळाल्यानंतर त्यांनी पिडीत तरूणीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.

11 सप्टेंबर रोजी निरीक्षक वाघ यांनी पिडीत तरूणीला बुर्‍हानगर परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे पिडीत तरूणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पिडीत तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक विकास वाघ विरोधात भादवि कलम 376, 313, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com