श्रीरामपुरात कत्तलीसाठी आणलेले पाच गोवंश पोलिसांनी पकडले

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
श्रीरामपुरात कत्तलीसाठी आणलेले पाच गोवंश पोलिसांनी पकडले

श्रीरामपूर l प्रतिनिधी

कत्तलीसाठी आणलेली पाच गोवंश पोलिसांनी (Police) पकडली असून दोन आरोपींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात (City Police Station) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील वार्ड नंबर 2 मध्ये राहणारा आरोपी फिरोज मुसा कुरेशी याने कत्तल करण्याच्या हेतूने पाच गोवंश जातीची जनावरे आणली होती. त्याने ही गोवंश जनावरे दुसरा आरोपी करण कांबळे यांच्या ताब्यात घेऊन टिळकनगर (Tilaknagar) भागात एका भिंतीलगत हे गोवंश आतिशय निर्दयतेने बांधून ठेवले तसेच त्यांची चारा-पाण्याची देखील काही सोय केली नाही.

याप्रकरणी वरील दोन आरोपींविरुद्ध श्रीरामपूर उपविभागीय कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात काल रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलिस नाईक राशिनकर हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com