पोहेगावमध्ये तीन ठिकाणी अवैध दारू जप्त; दोन आरोपींना अटक

पोहेगावमध्ये तीन ठिकाणी अवैध दारू जप्त; दोन आरोपींना अटक

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे शिर्डी पोलिसांनी तीन ठिकाणी

अवैध दारू धंदा विक्री करणार्‍या दारूच्या अड्ड्यावर धाडी टाकून देशी तसेच गावठी दारू जप्त केली आहे. यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी दिली.

शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव बीटमध्ये दि. 10 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता शिर्डी पोलिसांनी छापा टाकत मंगेश नारायण पवार, रा. पोहेगाव याच्याकडे 780 रुपये किंमतीच्या 15 नग देशी दारूच्या बॉबी संत्रा 180 मिलीच्या बाटल्या सापडल्या.

आनंद उर्फ छोट्या आहिरे, रा. पोहेगाव याच्याकडे 884 रुपये किंमतीच्या 17 नग देशी संत्रा 180 मिलीच्या दारू बाटल्या सापडल्या तर बाबासाहेब चंदन भोजने, रा. पोहेगाव याच्याकडे हातभट्टीची 20 लिटरची 2000 रुपये किंमतीची गावठी दारू सापडली. अशी एकूण तीन प्रॉव्हिजन गुन्ह्याचा कारवाया करण्यात आल्या.

यातील आनंद उर्फ छोट्या आहिरे हा आरोपी फरार झाला असून मंगेश नारायण पवार व बाबासाहेब चंदन भोजने या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाणे करत आहेत.

सदरची कार्यवाही पो. उपनिरीक्षक जाणे, पो. ना. मकासरे पो. ना. गोडे, पो. कॉ. राठोड यांनी सहा. पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com