देवळालीच्या तरुणाचा संगमनेरच्या तरुणीवर शारीरिक अत्याचार

राहुरी पोलिसात गुन्हा दाखल
देवळालीच्या तरुणाचा संगमनेरच्या तरुणीवर शारीरिक अत्याचार

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

नगर येथील एका मोठ्या खासगी रुग्णालयात नोकरी करणार्‍या एका 26 वर्षीय स्टाफ नर्सला फय्याज शेख याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सलग अकरा महिने वारंवार शारिरीक अत्याचार केल्याची घटना राहुरी व नगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या वर्षभरात घडली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत देवळाली प्रवरा येथील फय्याज असलम शेख या तरूणा विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

संगमनेर तालुक्यात राहत असलेली एक 26 वर्षीय तरुणी नगर येथील एका मोठ्या रुग्णालयात स्टाफनर्स म्हणून खासगी नोकरी करीत आहे. सध्या ती तरुणी त्या रुग्णालयासमोरच राहते. तिने राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि.13 जून 2020 ते 7 मे 2021 या दरम्यान आरोपी फय्याज असलम शेख, (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) याने फिर्यादी 26 वर्षीय तरुणीला राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा तसेच नगर येथील माळीवाडा परिसरातील लॉजवर घेऊन गेला.

तसेच तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केला. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील त्या तरुणीची राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील फय्याज शेख याच्याबरोबर ओळख झाली होती. ओळखीमधून घनिष्ठ संबंध निर्माण झाले. नंतर भेटीगाठी सुरू झाल्या. याच दरम्यान फय्याज शेख याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सुमारे एक वर्ष वारंवार शारीरिक अत्याचार केला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या तरुणीने राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांसमक्ष कथन केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com