
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
शेतीच्या कामासाठी ठेवलेल्या मजुराने दुचाकी, रोख रक्कम व तुरीची गोणी असा सुमारे 29 हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना हनुमान टाकळी येथे घडली. याबाबत नवनाथ गंगाधर बर्डे (रा. हनुमान टाकळी. ता. पाथर्डी) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
त्यानुसार बर्डे यांनी अहमदनगर येथील एजंटाच्या माध्यमातून शेतीकामासाठी गणेश वेणुनाथ हारदे (रा. तुळापुर, ता. राहुरी. जि.अहमदनगर) यास सात जानेवारीपासून कामाला ठेवले होते. 14 जानेवारीच्या रात्री दुचाकी, आठ हजार रुपये रोख व एक तुरीची गोणी असा एकूण 29 हजार 500 रूपयांचा मुद्देमालाची चोरी करून रात्रीच पोबारा केला.
दुसर्या दिवशी सकाळी बर्डे उठले असता त्यांना प्रकार लक्षात आला. यानंतर बर्डे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस कामगाराचा शोध घेत आहेत.